आधी टॅरिफ लादून शेअर बाजार पाडला, मग कोट्यवधींचे शेअर्स खरेदी केले; ट्रम्प यांच्यावर आरोप!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये विविध देशांवर टॅरिफ लादून जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण केली होती. त्याचवेळी, ट्रम्प यांनी शेअर बाजारातील घसरणीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले. त्यांनी ॲपल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले. त्यांच्या या कृतीमुळे शेअर बाजारात तेजी आली. ट्रम्प यांच्यावर राष्ट्राध्यक्ष पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला आहे.