EPFO चा मोठा निर्णय! पीएफमधून पैसे काढणे आणि पेन्शनच्या नियमांत बदल
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) नवीन नियम २०२६ लागू केले असून याद्वारे पीएफ आणि पेन्शन फंडात मोठे बदल करण्यात आले आहेत. कोअर बँकिंग प्रणाली, युनिफाइड UAN आणि २० दिवसांत क्लेम सेटलमेंट न झाल्यास १२% व्याजाची कडक तरतूद करण्यात आली आहे. आता आजारपण, शिक्षण किंवा लग्नासाठी खात्यातील शिल्लक रकमेच्या विशिष्ट मर्यादेतच ऑनलाईन पैसे काढता येतील.