मोठालं गॅरेज, हेलिपॅड अन् स्नोरुम; अभियांत्रिकीचा नमुना असलेलं अँटिलिया बांधलं कोणी?
मुकेश अंबानींच्या अँटिलिया इमारतीचे डिझाइन पर्किन्स अँड विल या कंपनीने केले असून लेइटन एशियाने बांधकाम केले आहे. २७ मजली इमारतीत तीन हेलिपॅड, १६८ कारसाठी गॅरेज आणि स्नोरुम आहे. ८.० रिश्टर स्केलपर्यंत भूंकपाला प्रतिबंध करणारी ही इमारत आहे. गौरी खानने अँटिलियासाठी बार लाउंज डिझाइन केले आहे. अँटिलिया ही जगातील सर्वांत महागड्या इमारतींपैकी एक आहे.