भारत-अमेरिका व्यापार करार होणार तरी कधी? ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे भारताची कोंडी?
भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित व्यापार करार अंतिम टप्प्यात असूनही करारावरील स्वाक्षरी लांबणीवर पडली आहे. रशियन तेल आयातीवर अमेरिकेने दिलेला १०० टक्क्यांपर्यंतच्या टॅरिफचा इशारा आणि इतर मुद्द्यांमुळे वाटाघाटींमध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे.