गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार? पुढील ५ वर्षांत शेअर बाजार देणार १५ टक्के परतावा
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांच्या मते, भारतीय शेअर बाजारातून पुढील पाच वर्षांत सुमारे १५% वार्षिक परतावा मिळू शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेत ७.५ ते ८.५% आणि कंपन्यांच्या नफ्यात १३ ते १४% वाढ होण्याची शक्यता आहे. एआयमुळे आयटी क्षेत्रात बदल होणार असून, भांडवली खर्चामुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ होईल. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.