मुंबई शेअर बाजाराची चांदी; गुंतवणूकदारांनी अवघ्या काही मिनिटांत कमावले २ लाख कोटी!
अमेरिका आणि इराणमधील शांतता करारानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे. सेन्सेक्स ५०९.७३ अंकांनी वाढून ७७,५००.९५ वर पोहोचला, तर निफ्टी १५३.०५ अंकांनी वाढून २४,१७४.७० वर व्यवहार करत होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तेलाच्या घसरलेल्या किमती आणि चिप कंपन्यांचे सकारात्मक निकाल यामुळे आशियाई बाजारातही वाढ झाली आहे.