५ वी पास ते ११२५० कोटींची कंपनी! आईच्या ४ बांगड्यांवर सुरु केला व्यवसाय
ललिता ज्वेलरीचे मालक किरण कुमार यांचा प्रवास आर्थिक संघर्षातून सुरू झाला. नेल्लोरमधील गरीब कुटुंबात जन्मलेल्या कुमार यांनी लहान वयातच शाळा सोडून दागिने व्यवसायात पाऊल ठेवले. त्यांच्या आईने दिलेल्या सोन्याच्या चार बांगड्यांपासून त्यांनी व्यवसाय सुरू केला. आज, ललिता ज्वेलरीचे ६१ दुकाने असून कंपनी शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचे उत्पन्न २५,०३९.८० कोटी रुपये आणि नफा १,००९.८२ कोटी रुपये झाला.