“गरीब लोकांनी मुले जन्माला घातली, तर गरिबी वाढेल”, उद्योगपतीच्या पत्नीचे वादग्रस्त वक्तव्य
रिअॅलिटी शो 'लॉक अप' च्या दुसऱ्या सीझनमध्ये उद्योगपती अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांनी तिसऱ्या मुलाबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले की, श्रीमंत लोक तिसरे मूल जन्माला घालतात, त्यामुळे त्यांची श्रीमंती वाढते, तर गरीब लोकांची गरिबी वाढते. या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशनीर ग्रोव्हर हे 'भारत पे'चे सह-संस्थापक आहेत.