‘थारचे ग्राहक दादागिरी करणारे अन् कमी शिकलेले’; बॉम्बे शेव्हिंग कंपनीच्या संस्थापकाची टीका
महिंद्रा थारच्या प्रतिमेबाबत बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक शंतनू देशपांडे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीव्र टीका केली आहे. त्यांनी थारच्या हुल्लडबाज संस्कृतीवर आणि महिंद्राच्या शोरूममधील वातावरणावर नाराजी व्यक्त केली आहे. थारच्या प्रतिमेमुळे महिंद्राला प्रीमियम मॉडेल आणता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.