शेअर बाजारात पडझडीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी वधारले
गेल्या आठवड्याभरातील पडझड थांबून सोमवारी शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला. सेन्सेक्स ०.३४% वाढून ७९,३४३.६३ वर, तर निफ्टी ०.३४% वाढून २४,१२२.१० वर उघडला. रिलायन्स, एम अँड एम, भारती एअरटेल यांसारख्या कंपन्यांनी चांगली वाढ नोंदवली. काही शेअर्स संघर्ष करत आहेत. आज टीव्हीएस मोटर, अदानी टोटल गॅस यांसारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार उत्सुक आहेत.