धक्कादायक! मेटा १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; २० मे पासून ‘ले-ऑफ’चे संकट
ओरॅकलने ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर मेटा प्लॅटफॉर्मनेही २०२६ मध्ये १६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात २० मे पासून ८,००० कर्मचाऱ्यांना फटका बसेल. मेटा कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करत असून, १३५ अब्ज डॉलर्सचा भांडवली खर्च डेटा सेंटर्स, चिप्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी करणार आहे. २०२२ आणि २०२३ मध्येही मेटाने २१,००० कर्मचाऱ्यांना कमी केले होते.