NSE IPO Price Band: अवघ्या १४२८० रुपयांत NSE चे मालक होण्याची संधी!
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर १,७०० ते १,७८५ रुपये प्राईज बँड निश्चित केली आहे. आयपीओ १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान खुला असेल. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू १ रुपये असून, लॉटचा आकार आठ शेअर्सचा आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% आणि पात्र संस्थात्मक बोलीदारांसाठी ५०% हिस्सा राखीव आहे. एनएसईच्या आयपीओचे मूल्य २२,५६१.५७ कोटी रुपये असेल.