तोटा भरून काढण्याच्या नादात खिसा रिकामा; तोट्यात लोटणाऱ्या ‘ऑप्शन ट्रेडिंग’चे भयानक वास्तव
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आयुष्यभराची बचत गमावल्याची व्यथा एका व्यक्तीने रेडिटवर व्यक्त केली आहे. त्यांनी मोठ्या आर्थिक फटक्यानंतर ट्रेडिंग सोडण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. सुरुवातीच्या तोट्यानंतर ओव्हरट्रेडिंगमुळे नुकसान वाढले. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या तोट्यानंतर ट्रेडिंगपासून अंतर ठेवणे आणि समुपदेशन घेणे महत्त्वाचे आहे. सेबीच्या अभ्यासानुसार, ९३ टक्के ऑप्शन ट्रेडर्सना तोटा सहन करावा लागतो.