सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानकडेच IMF चे अध्यक्षपद
पाकिस्तानची २०२७ साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक समूहाच्या गव्हर्नर्स मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. १९५३ नंतर प्रथमच पाकिस्तानला हे पद मिळणार आहे. पाकिस्तानचे आर्थिक व्यवहार मंत्री अहद खान चीमा यांची थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या बैठकीत औपचारिक घोषणा करण्यात आली. IMF कडून सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या देशाकडे अध्यक्षपद दिल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानने नुकतंच १.२ अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य IMF कडून मागितलं आहे.