‘आता PF चे पैसे UPI द्वारे त्वरित काढता येणार’, एकावेळी किती रक्कम काढण्याची मुभा?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता युपीआय प्रणालीचा वापर करणार आहे. जेणेकरून खातेधारकांना पीएफचे पैसे काढणे सोपे जाईल. यामुळे पीएफ व्यवहार जलद होतील आणि वेळ वाचेल. केंद्रीय डेटाबेस तयार केल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस ही सुविधा उपलब्ध होईल. युयाशिवाय, गृह, शिक्षण आणि लग्नासाठीही पीएफचे पैसे वापरता येतील.