तुमचे बँक खाते ‘मनी म्यूल’ तर नाही ना? गुन्हेगारांचे नवे हत्यार; एका चुकीमुळे होऊ शकते जेल
डिजिटल बँकिंगच्या युगात 'मनी म्यूल' (Money Mule) नावाचा नवा सायबर धोका वेगाने वाढत आहे. नकळतपणे तुमचे बँक खाते काळा पैसा पांढरा करण्यासाठी किंवा सायबर फसवणुकीचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाऊ शकते. वर्क फ्रॉम होम, रोमान्स स्कॅम किंवा बनावट जाहिरातींना बळी पडून अनेकजण यात अडकतात. मनी म्यूल झाल्यास कायदेशीर कारवाई, तुरुंगवास आणि बँक खाते गोठवले जाण्याची मोठी कारवाई होऊ शकते. या सायबर फ्रॉडपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याची सविस्तर माहिती.