पीएफचे नियम बदलले! केंद्र सरकारकडून ‘EPF योजना २०२६’ लागू; पगारावर काय होणार परिणाम?
'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना' (EPFO) अंतर्गत केंद्र सरकारने नवीन 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, २०२६' अधिसूचित केली आहे. ही नवीन योजना जुन्या १९५२ च्या नियमांची जागा घेणार असून, याद्वारे पीएफ योगदान, ऐच्छिक कपात (VPF) आणि खाते व्यवस्थापनाचे नियम बदलले आहेत. विशेषतः कंत्राटी कामगारांची सुरक्षा आणि पीएफचे नियम अधिक कडक करण्यात आले असून डिजिटल प्रशासनावर भर देण्यात आला आहे.