रिस्क घ्या, नका घेऊ; हायब्रिड म्युच्युअल फंड योजना का आहे सोयीची आणि फायदेशीर?
शेअर बाजारातील चढ- उतारांमध्ये सुरक्षितता आणि चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर हायब्रिड म्युच्युअल फंड हा एक उत्तम मार्ग आहे. यात इक्विटी आणि डेट साधनांचा समतोल साधला जात असल्याने कमी धोका पत्करून भांडवल वृद्धी होते. तरुण नवोदित गुंतवणुकदारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठीच हायब्रिड फंड का सोयीचे आणि फायदेशीर ठरतात, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.