नोकरी गेल्यावर आता मिळणार ‘पुनर्कौशल्य निधी’; जाणून घ्या, काय आहे नवीन नियम?
कामगार कायद्यात अलीकडेच काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले. या अंतर्गत कामगाराच्या व्याख्येमध्येही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी हंगामी आणि कायमस्वरूपी असा फरक होता. आता फरक कायम असला तरी त्यांना मिळणाऱ्या फायद्यांमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नोकरीवरून कमी केल्यास आता कर्मचाऱ्यांना पुनर्कौशल्य निधी मिळू शकतो.