सावधान! आता ITR-4 मध्ये बँक शिल्लक जाहीर करणे अनिवार्य; करदात्यांवर होणार कोणता परिणाम?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी प्राप्तिकर विवरणपत्र-४ (ITR-4) मध्ये मोठे बदल केले आहेत. आता करदात्यांना त्यांच्या सर्व बँक खात्यांतील शिल्लक रक्कम जाहीर करणे अनिवार्य झाले आहे. ३० मार्च २०२६ च्या अधिसूचनेनुसार, कलम ४४एडी आणि ४४एडीए अंतर्गत येणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना हा नियम लागू होईल. कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि डेटा-आधारित देखरेख ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.