डिजिटल फसवणूक झाल्यास २५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई कशी मिळवाल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २०२६ च्या पहिल्या पतधोरणात ग्राहक संरक्षणावर भर दिला आहे. बँकांकडून ग्राहकांना विनाकारण पॉलिसी विकणे आणि वसुलीसाठी गुंडगिरी करणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाई होणार आहे. डिजिटल फसवणूक झाल्यास रु.२५,००० पर्यंत नुकसान भरपाई मिळेल. डिजिटल पेमेंट सुरक्षिततेसाठी टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशनचा वापर केला जाईल.