“हे आकडे खरे आहेत का?” रघुराम राजन यांचा GDP वाढीवर प्रश्नांचा भडीमार
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी जीडीपी वाढीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना रोजगार का निर्माण होत नाहीत? राजन यांनी जीडीपी आकडेवारीवर शंका व्यक्त केली आणि सरकारने रोजगार निर्मितीसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे सुचवले. त्यांच्या मुलाखतीनंतर मोहनदास पै यांनी रोजगाराबाबत खोटा प्रचार होत असल्याचा आरोप केला आणि ईपीएफओद्वारे रोजगार आकडेवारी जाहीर करण्याची विनंती केली.