२ वर्षे झाली पोर्टफोलिओ जागचा हलत नाहीये? तिसऱ्या वर्षी पैसे दुप्पट होणार की आणखी फसणार?
गेल्या दोन वर्षांत निफ्टी ५० निर्देशांकाने विक्रमी उच्चांक गाठला, परंतु नंतर मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात बाजाराची वाढ थांबली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु एडलवाईस म्युच्युअल फंडच्या विश्लेषणानुसार, भूतकाळात निफ्टीने सलग दोन वर्षे सपाट परतावा दिल्यानंतर बाजाराने पुढील तीन वर्षांत सकारात्मक परतावा दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन मंदीनंतर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.