गुंतवणूकदारांची दिवाळी, १ लाखाचे झाले थेट ३ लाख रुपये! SGBच्या रिडेम्पशनची किंमत जाहीर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 'सॉव्हरिन गोल्ड बाँड' (SGB) २०२०-२१ सिरीज VI साठी प्री-मॅच्युअर रिडेम्पशन किंमत जाहीर केली आहे. गुंतवणूकदार ८ सप्टेंबर २०२६ पासून बाँड्स परत करू शकतात. रिडेम्पशन किंमत प्रति युनिट १५,३८४ रुपये आहे. या बाँड्सवर गुंतवणूकदारांना २०४% परतावा मिळणार आहे. सुरुवातीला १ लाखाची गुंतवणूक आता ३.०४ लाख रुपये झाली आहे.