शेअर बाजारातून नफा कमवाय? ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे आहेत का?
थेट शेअर गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असली तरी ती आव्हानात्मक असते. म्युच्युअल फंडात व्यावसायिक फंड मॅनेजर्स निर्णय घेतात, तर थेट शेअर गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना स्वतः निर्णय घ्यावे लागतात. योग्य कंपन्यांची निवड, जोखीम तपासणे, आणि शेअर्स कधी खरेदी-विक्री करायचे हे ठरवणे आवश्यक असते. गुंतवणूक करण्यापूर्वी स्पष्ट रणनीती, व्यवसायाचे विश्लेषण, आणि सतत देखरेख करण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे.