AI मानवजात संपवणार? OpenAI अन् Anthropic च्या मुख्य संशोधकाचा राजीनामा
ओपन एआय आणि अँथ्रोपिक या एआय क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्ये काम केलेल्या संशोधक जेकब कॉक्सन यांनी एआयच्या धोक्यांबाबत गंभीर इशारा देत अँथ्रोपिकमधून राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की, या कंपन्या सुरक्षेपेक्षा प्रगत मॉडेल विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. कॉक्सन यांनी एआय मानवी जीवनाला धोका निर्माण करू शकते असे म्हटले आहे. त्यांच्या या चिंतेला अँथ्रोपिकच्या दोन विद्यमान कर्मचाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे.