३८ हजार ChatGPT प्रश्नांची १ बदामाशी तुलना; AI च्या पाणी वापरावर ऑल्टमन काय म्हणाले?
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी डेटा सेंटर्सच्या पाणी वापराबाबतच्या चिंतेवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, चॅटजीपीटीवरील ३८ हजार प्रश्नांसाठी लागणारे पाणी एका बदामाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याइतकेच असते. ऑल्टमन यांनी स्पष्ट केले की, डेटा सेंटर्समध्ये आता 'इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग' वापरली जात नाही. त्यांनी डेटा सेंटर्सच्या पाणी वापराबाबतच्या तक्रारींना तर्कहीन म्हटले आहे.