मुंबईत ६३९ कोटींचा भारतातील सर्वात महागडा फ्लॅट घेणाऱ्या लीना तिवारी कोण आहेत?
युएसव्ही कंपनीच्या अध्यक्ष लीना तिवारी यांनी मुंबईतील वरळी येथे ६३९ कोटीं रुपयांना डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला असून हा भारतातील सर्वात महागडा फ्लॅट ठरला. लीना तिवारी युएसव्ही या औषध निर्माता कंपनीच्या अध्यक्ष असून, त्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३.९ अब्ज डॉलर्स आहे.