५ पैकी १ कोट्यधीश भारत सोडण्याच्या तयारीत; श्रीमंतांना कोणते देश खुणावत आहेत?
भारतातील श्रीमंत व्यक्ती विदेशात स्थायिक होण्याचा ट्रेंड वाढत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या अहवालानुसार, २२ टक्के श्रीमंत भारतीय नागरिक विदेशात जाण्याची योजना आखत आहेत. २०२३ मध्ये २५ कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या २.८३ लाख भारतीयांना अतिश्रीमंत गणले गेले. २०२८ पर्यंत हा आकडा ४.३ लाख होईल. चांगली जीवनशैली, आरोग्य सुविधा, आणि व्यवसायासाठीचे सुलभ वातावरण ही प्रमुख कारणे आहेत.