पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘आयआयटी’मध्ये संशोधन शिष्यवृत्तीची संधी!
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली येथे 'उन्हाळी संशोधन फेलोशिप कार्यक्रम २०२६' साठी अर्जप्रक्रिया सुरू आहे. एम. टेक. आणि एम.ई. विद्यार्थ्यांना आठ आठवड्यांच्या या फेलोशिपद्वारे नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी मिळेल. अर्ज १६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान करता येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवास, वास्तव्य, भोजन आणि प्रति आठवडा दोन हजार रुपये फेलोशिप मिळेल. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील.