मुंबई महानगपालिकेत नोकरीची संधी! दर महिना ९२ हजारापर्यंत पगार; ‘हे’ उमेदवार करु शकतात अर्ज
मुंबई महापालिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे मुंबई महानगपालिकेने रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिका ‘करनिर्धारण आणि संकलन’ विभागातील गट क मधील ‘विभाग निरीक्षक’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.