बारावीचा निकाल वेबसाईटवर लोड होत नाहीय? मग SMS आणि DigiLocker ने सेकंदात दिसेल रिझल्ट…
Step-by-step guide to Check Maharashtra 12th Result via SMS and DigiLocker: महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. महाराष्ट्र HSC निकाल 2026 उद्याच म्हणजे २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, हजारो बारावीचे विद्यार्थी आपले गुण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आपला बारावीचा निकाल 2026 mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल.