चहाच्या टपरीवर वडिलांना मदत, मित्रांनी उडवली टिंगल; ‘असा’ झाला चहावाला देशाचा IAS अधिकारी!
IAS हिमांशू गुप्ता यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. उत्तराखंडच्या छोट्या गावातून आलेल्या हिमांशू यांनी गरिबी आणि सामाजिक टिंगल-टवाळीवर मात करत UPSC परीक्षेत यश मिळवले. चहाच्या टपरीवरून सुरू झालेला प्रवास, शिक्षणासाठी ७० किमीचा प्रवास, इंग्रजीचे आव्हान आणि अखेर IRTS, IPS आणि IAS परीक्षेत यश मिळवून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.