यशाला वय आणि वेळेचं बंधन नसतं! IAS सृष्टी डबासची थक्क करणारी यशोगाथा
IAS सृष्टी डबासची यूपीएससी यशोगाथा: दिल्लीच्या सृष्टी डबासने जिद्द, चिकाटी आणि नियोजनाच्या जोरावर यूपीएससी २०२३ परीक्षेत कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर ६ वा क्रमांक मिळवला. नोकरी सांभाळून तिने हे यश मिळवले. सृष्टीने स्व-अभ्यासावर भर दिला आणि राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध विषयाची निवड केली. तिच्या यशाचे गमक सातत्यपूर्ण अभ्यास, स्वतःवरचा विश्वास आणि योग्य नियोजन आहे.