दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा कधी? अर्ज प्रक्रियेची तारीख काय?
Maharashtra SSC Supplementary Exam Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकालातच १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थ्यी उर्तीर्ण झाले आहे, त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्के ९४.१० टक्के इतकी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाात १.७१ टक्के घट झाली. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे.