मुंबईतील झोपडपट्टीत दूध अन् पुस्तकं विकून काढले दिवस; आज २० हजार कोटींच्या संपत्तीचा मालक
Billionaire Rizwan Sajan Success Story : भारतात असे अनेक उद्योगपती आहेत की, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष बाब म्हणजे यातील काही लोकांना वारसा हक्काने कोणतीही संपत्ती मिळाली नाही; पण त्यांनी स्वबळावर देशातच नव्हे, तर परदेशातही स्वत:चे नाव बनवले आणि एक मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी उद्योगपतीची यशोगाथा सांगणार आहोत, जो एकेकाळी मुंबईतील झोपडपट्टीत राहून छोट्या-छोट्या नोकऱ्या करायचा, तो आज दुबईतील सर्वांत श्रीमंत भारतीयांपैकी एक आहे.