‘एमपीएससी’चा निकाल जाहीर! प्रवर्गनिहाय कट-ऑफ घोषित; पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा–२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि कट-ऑफ गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यंदा कट-ऑफ विक्रमी लागल्याने स्पर्धा वाढली आहे. निकाल जाहीर करण्यासाठी आयोगाने साडे तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ घेतला. पात्र उमेदवारांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येत आहे.