नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी! महिना ३ लाखांपर्यंत पगार
NABARD Specialist Officers Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली आहे. ज्याद्वारे नाबार्डमध्ये ६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदे भरली जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.nabard.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरू होऊन १ जून २०२५ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.