वयाची ४० शी, ऐकण्याची समस्या अन् २ मुलींची जबाबदारी; जिद्दीच्या जोरावर ‘निसा’ बनल्या IAS!
केरळच्या निसा उन्नीराजन यांनी वयाच्या ४० व्या वर्षी, दोन मुलींची आई आणि घर-संसाराची जबाबदारी सांभाळत, UPSC परीक्षेत १००० वी रँक मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ऐकण्याच्या समस्येवर मात करत, सातव्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या पती आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं. निसा यांनी स्वतःची रणनीती वापरून अभ्यास केला आणि सात वर्षांच्या प्रयत्नानंतर यश मिळवलं.