कोटींच्या पॅकेजची नोकरी नाकारत पठ्ठ्यानं वडिलांची इच्छा पूर्ण केली; यूपीएससीत मारली बाजी
राजस्थानमधील विकास कुमार मीणा यांनी अडथळ्यांना पार करत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विकास यांनी NIT दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी कोटींच्या नोकरीच्या ऑफरला नाकारून नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये अपयश आल्यानंतर, २०२३ मध्ये त्यांनी AIR ६७२ सह परीक्षा उत्तीर्ण केली.