अंडी विक्रेत्याचा मुलगा होणार न्यायाधीश! आईने काढलेल्या कर्जावर घेतलं शिक्षण
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने BPSC 32 व्या न्यायिक सेवा परीक्षेचा अंतिम निकाल २०२४ जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांच्या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या कहाण्या समोर येत आहेत. त्यातील एक यशोगाथा म्हणजे औरंगाबादमधील शिवगंज येथील आदर्श कुमार यांची. BPSC ची ३२ वी न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आदर्श कुमार न्यायाधीश बनले आहेत.