एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा
प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत घेत असतो. कितीही अपयश आलं, संकटं आली तरी ती मागे टाकून, सतत पुढे जाण्याची जिद्द आणि आशा त्याच्याकडे असली की सगळं काही शक्य होतं. अशाच संघर्षाला सामोरं जात विटा उचलण्याच्या कामापासून ते डीएसपी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास संतोष कुमार पटेल यांनी केला आहे.