शिक्षण अर्धवट सोडून या कामाला केली सुरूवात, आता उभारलाय १६४ कोटींचा ब्रॅंड
अगदी लहान वयातही आपण यश मिळवू शकतो हे एका तरुणाने सिद्ध केलं आहे. आज आपण त्याच तरुणाच्या यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे हर्षित अग्रवाल. हर्षित अग्रवालने खूप कमी वयात यश मिळवले आहे. त्याचे वय २६ वर्षे आहे. तो नोएडाचा रहिवासी आहे. हर्षितने फक्त सहा वर्षांत १६४ कोटी रुपयांचा एअर कूलर ब्रँड नोव्हामॅक्स बनवला आहे. त्याने जुलै २०१८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्याच्या वडिलांच्या अनब्रँडेड एअर कूलर व्यवसायाच्या यशावर भर देत कंपनी सुरू केली. पहिल्याच वर्षी त्याने ३.५ कोटी रुपयांची उलाढाल केली.