शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS
जर तुमचा इरादा पक्का असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमचं यश गाठण्यापासून रोखू शकत नाही, असं म्हणतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे देशल दान रतनूची, जो राजस्थानच्या जैसलमेर येथील एका गरीब कुटुंबात वाढला आहे.
मर्यादित संसाधने आणि कोणतेही प्रशिक्षण नसतानाही, देशल दानने केवळ UPSC परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर ८२ वा अखिल भारतीय रँक मिळवून इतिहासही रचला.