UGC ची मोठी कारवाई! ३२ बनावट विद्यापीठे जाहीर
देशात बनावट विद्यापीठांचे प्रमाण वाढत असून, १२ राज्यांमध्ये ३२ बनावट विद्यापीठे आढळली आहेत. दिल्लीमध्ये सर्वाधिक १२, तर महाराष्ट्रात २ विद्यापीठे आहेत. यूजीसीने विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बनावट विद्यापीठे मोठ्या शहरांपासून खेड्यांपर्यंत पसरली असून, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. यूजीसीने बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे, परंतु प्रभावी कारवाई होत नाही.