‘यूपीएससी’च्या दोन पूर्व परीक्षांसाठी अर्जाची मुदत वाढली; ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ वरून २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी येत असल्याने ही मुदत वाढवण्यात आली. पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी आणि मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. अर्ज प्रक्रिया UPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून पूर्ण करता येईल.