१० वर्षे ९ ते ६ ची खाजगी नोकरी, विवाह आणि सलग चार अपयश… अखेर नविता कुमारी बनली IPS अधिकारी
IPS नविता कुमारी यांनी कठोर परिश्रम, योग्य रणनीती आणि मार्गदर्शनाच्या मदतीने UPSC परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी खाजगी नोकरी करत अभ्यास सुरू ठेवला. सलग चार अपयशानंतरही त्यांनी हार मानली नाही. पाचव्या प्रयत्नात त्यांनी २०२२ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IPS पदावर निवड झाली. त्यांच्या यशोगाथेत 'कधीही हार न मानण्याची वृत्ती' आणि 'कठोर परिश्रमाचे महत्त्व' अधोरेखित होते.