केवळ ०.३ गुणांनी हुकली होती संधी, पण हार मानली नाही; प्रियांका बनल्या IAS अधिकारी!
दिल्लीच्या प्रियांका गोयल यांनी यूपीएससी परीक्षेत सलग पाच वेळा अपयश पदरी पडूनही सहाव्या प्रयत्नात ३६९ वा रँक मिळवून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. महाराजा अग्रसेन मॉडेल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या प्रियांकाने दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. कौटुंबिक अडचणींवर मात करत, दिवसाचे १७-१८ तास अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवले. त्यांची निवड DANICS कॅडरमध्ये झाली आहे.