नोकरी, जबाबदाऱ्यांचा डोंगर… तरीही जिद्दीने बनल्या IAS! श्वेता भारतींची प्रेरणादायी कहाणी
IAS अधिकारी श्वेता भारती यांनी ९ तासांच्या नोकरीनंतरही यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. पाटणामध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भागलपूर येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. नोकरी सांभाळत त्यांनी यूपीएससीची तयारी केली आणि २०२१ मध्ये ३५६ वा रँक मिळवला. त्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. श्वेता भारती यांची यशोगाथा जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे.