मुलाखतीत प्रिया राणीने दिलं असं काही उत्तर की सर्वच झाले निशब्द; गावची मुलगी झाली IAS
IAS प्रिया राणी यशोगाथा: बिहारच्या एका छोट्याशा गावातील प्रिया राणीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ६९वी रँक मिळवली. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर बेंगळुरूमधील नोकरी सोडून तिने नागरी सेवांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तीन प्रयत्नांत अपयश आले तरी तिने चिकाटी सोडली नाही. चौथ्या प्रयत्नात तिने यश मिळवले. तिच्या यशाचे श्रेय चिकाटी, शिस्त आणि शिक्षणाला जाते.